Special Cafe !
आज सिकंदराबाद मधल्या Deaf Enabled Foundation या संस्थेत कामानिमित्त गेले होते. ऐकू न येणाऱ्या आणि बोलता न येणाऱ्या लोकांसाठी ही संस्था काम करते हे संस्थेच्या नावातून समजतंच. विशेष म्हणजे जिथे आमचं काम चालतं तिथे काम करणारे, हा उपक्रम चालवणारे सगळे ऐकू आणि बोलू न शकणारे आहेत. संस्थेचे अकाउंट्स सांभाळणारी मुलगी आणि समन्वयक दोघंच असे होते जे ऐकू बोलू शकत होते पण Indian Sign Language मधूनही ते उत्तम प्रकारे व्यक्त होत होते. सगळं काम सुरळीत आणि शांततेत सुरू होतं. मी साधारण तिथे दोन एक तास होते. काम करत होते आणि सोबतच आजूबाजूला न्याहाळत होते. कधी कधी आपल्याकडं सगळं आहे हे आपण किती गृहीत धरतो ? मध्यंतरी लॉकडाऊन च्या काळात Indian Sign Language चा छोटा कोर्स मी केला. त्याचा आज फायदा झाला. पूर्वी अश्या संस्थेत गेल्यावर सगळ्यांशी बोलताना interpreter शिवाय जमायचं नाही . पण आज मोडक्या तोडक्या का होईना पण Indian Sign Language मधून मला सगळ्यांशी संवाद साधता आला. ते काय बोलत होते तेही मला नीट समजत होतं. कुठल्याही मध्यस्थाशिवाय मला त्यांच्याशी बोलता येत होतं. आपण जेव्हा वेगळ्या प्रांता...