शाळा....
आपल्या आयुष्याचा "आठवणी "या अविभाज्य घटक असतात. काही चांगल्या, काही नकोश्या,काही अवघडलेपण देणाऱ्या. या सगळ्याचा एक कोलाज असतो आणि अचानक कधीही तो डोकं वर काढतो. या आठवणींना कधी चेहेरा असतो, कधी भावना, कधी जागा किंवा ठिकाण , कधी वास , कधी चव ,कधी आवाज ,तर कधी स्पर्श.या प्रत्येक अनुभूतीतून त्याच्याशी निगडीत आठवण येते. अगदी नकळतपणे. आठवणींच्या या हिंदोळ्यावर मला कायमच झुलायला आवडतं. आज माझ्या प्राथमिक शाळेत गेले. निमित्त होतं नवीन मराठी शाळेचं शतकोत्तर रौपयमहोत्सवी वर्षात पदार्पण. पुण्यात असूनही चौथीनंतर इतक्या वर्षांनी त्या वास्तूत गेले. अनेक आठवणींची ही जागा. असं ठिकाण जिथे आयुष्याचा अगदी सुरुवातीचा काळ घालवला.सुंदर, दगडी दोन मजली इमारत, जिना आणि व्हरांडा याला असलेला रेखीव लाकडी कठडा, मोठ्याला खिडक्या ,प्रशस्त असेम्ब्ली हॉल, गायन वर्ग, चित्रकलेचा वर्ग, शाळेची घंटा जिथे बांधली होती ती जागा, मुख्याध्यापकांची खोली, शिक्षकांची खोली, बँड साठी खास असलेली जागा, हस्तव्यवसाय वर्ग, तिथलं चिंचेचं झाड. या सगळ्या फक्त जागा नाहीत तर आठवणींचे अनेक कोपरे आहेत. आज शाळेत वर्ग मैत्रिणींसोब...