Posts

Showing posts from March, 2021

एका ' कटा 'ची गोष्ट

 एक 'कटा'ची गोष्ट. श्रावणी शुक्रवार असो किंवा होळी,त्यांचं धार्मिक महत्त्व, त्या अनुषंगाने येणारं कर्मकांड या सगळ्यापलिकडे मला हे दिवस आवडतात. त्यातलं प्रमुख एक कारण म्हणजे त्या दिवशी खायला मिळणारी आईच्या हातची पुरणपोळी. अश्या सणासुदीचं तिचं प्लॅनिंग वाखाणण्याजोगं असतं. निगुतीनं केलेलं खमंग पुरण,मन लावून आणि भरपूर वेळ देऊन भिजवलेली सैलसर कणीक, त्यात टाकलेलं अस्सल केशर. बीडाच्या तव्यावर अत्यंत सुरेख लाटलेली पुरण पोळी जेव्हा भाजली जाते तेव्हा सुटणारा तो घमघमाट. तो क्षण शब्दात बांधून ठेवता आला तर .... आणि तुपाची धार सोडलेल्या त्या पुरणपोळीची चव जीभेवर कायम साठवून ठेवता येणे जमलं तर...... आईसारखी पुरणपोळी करण्याचे मी आटोकाट आणि अनेक प्रयत्न केले पण ते जमलं नाही अजून. पण माझ्यामते पुरणपोळी ज्या शिवाय अपूर्ण आहे तो पदार्थ करण्यात माझा कोणी हात धरू शकत नाही.....तो म्हणजे 'कटाची आमटी'. पुरणयंत्रातून पुरण काढून झाल्यावर राहिलेल्या कटाची आमटी करण्याची पद्धत जुनीच. कदाचित हा पुरणाचा कट किंवा डाळीचं पाणी वाया जाऊ नये म्हणून काढलेली शक्कलही असावी . पण या कटाचा जो काही अशक्य पदार्थ  ...