Posts

Showing posts from February, 2021

कोकण.....परत एकदा

 वर्षानुवर्षे कोकणात जात असलो तरी प्रत्येक वेळी ते नवं वाटतं. समुद्र,सुंदर किनारे,लाल माती,शहाळी,मोदक, मासे, मिरगुंड, कोकम या सगळ्या पलीकडे खूप काही आहे आणि प्रत्येक वेळी त्यातलं काही ना काही गवसतं.त्याच ठिकाणी परत गेलो तरी नवं काही अनुभवून येतोच येतो. तसाच अनुभव यावेळीही आला. अगदीच आयत्यावेळी ठरलं आणि आम्ही कोकण गाठलं. अडीच दिवसात आधीच दोन वेगळ्या ठिकाणी गेल्याने  वेळ अगदी कमी पण तरीही नवं काही बघण्याची ओढ होती. दरवेळी जाऊनही जी दोन ठिकाणं राहिली होती ती बघायची होती. कुडाळ वरून पंधरा किलोमीटवर असलेलं वालावल. वालावलचं लक्ष्मीनारायण मंदिर फोटो आणि व्हिडिओत बघितलं होतं. पण तिथे जाऊन प्रत्यक्ष बघणं हा नितांत सुंदर अनुभव असणार होता. कुडाळ मध्ये बांबू हस्तकला केंद्र आहे अशी कुणकुण लागली होती आणि "परत इतक्या लांब कशाला येतोय", असं म्हणत त्या केंद्राला भेट देणं नक्की केल. गाडी कुडाळ च्या MIDC मध्ये घातली. वाट वाकडी करून गेलो खरं पण इंटरनेट ने साथ सोडली आणि offline map download न केल्यामुळे वारंवार गाडी थांबवून रस्ता विचारणे सुरू झालं. एक तर बांबू केंद्राचा नक्की पत्ता ठाऊक नव्हता, त...