लूडो
ओ बेटाजी , किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, याचा अनुभव घेतलेले तुम्ही आम्ही सगळेच. आपल्या प्रत्येकाची गोष्ट वेगळी,स्वप्न वेगळी आणि तिथपर्यंत जाण्याची वाट, ती सुद्धा वेगळी. काहींची स्वप्न पुरी होतात आणि काहींची नाही ,पण तिथपर्यंत चा प्रवास सगळेच करतो आपण. अनेकदा या प्रवासात कोण यशस्वी झाला आणि कोण अयशस्वी हे ओळखण्याचे आपापले निकष असतात. पण प्रत्येकवेळी तेवढेच निकष लावून चालत नाही. दिसतं त्या पलीकडे आणि अलिकडे खूप काही असतं . ते आपल्याला नाही दिसलं तरी ते असतं आणि असं सगळं घडवून आणणारा असतो एक अदृश्य घटक ( ज्याला देव म्हणा, प्राक्तन म्हणा, गेल्या जन्मीचं काही म्हणा). हा घटक आपल्या प्रवासाला दिशा देतो. १०० टकके योग्य आणि अयोग्य असं काही नसतं आणि हेच अधोरेखित करणारा लुडो हा चित्रपट. एकदा बघावा असाच आहे हा ludo. पाप आणि पुण्य म्हणजे नेमकं काय . आपण जे पाप समजतो ते खरंच पाप असतं का? आणि पुण्य म्हणजे काय, हे आपल्याला नक्की व्याख्येत बसवता येतं का ? हे आणि असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात जेव्हा ludo चा शेवट होतो. हा खेळ आहे. चार रंगाच्या चार सोंगट्या आणि त्यांची दिशा आणि दशा ठरवणारा एक...